|
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा
ठळक बाबी
1) घरांची, गावांची व परीसरांची स्वच्छता व्हावी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्यमान व पर्यायानेᅠजीवामान उंचाविणे .
2) स्वच्छतेतुन समृध्दीकडे ही संकल्पना मुर्त स्वरुपात यावी.
3) ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमांतर्गत जे कार्यक्रम आखण्यात येतात त्या कार्यक्रमाची परीणामकारक अंमलबजावणी .
गावातील स्वच्छतेची परिस्थिती सुधारण्यासाठी व त्यात सातत्य राहण्यासाठी ग्रामस्थांचा अत्स्फूर्त सहभाग .
५) यामध्ये शासनाची भुमीका सहाय्यकर्ता व मार्गदर्शकाची असणार आहे..
अभियानाची पुर्व तयारी
१. दरवर्षी दिनांक १ ते २५ सप्टेंबर :- या कालावधीमध्ये अभियानाची पुर्व तयारी म्हणुन विभागवार व
जिल्हास्तरावर बैठका आयोजीत करुन २ आक्टोंबर पासुन सुरु होणार्या अभियानात सहभागी होण्याचे
आवाहन करतील.
२. दरवर्षी दिनांक २६ ते २९ सप्टेंबर :- या कालावधीमध्ये गटविकास अधिकारी तालुक्यातील सर्व ग्रा.पं.
चे सरपच, ग्रामसेवक यांची सभा तालुकास्तरावर बोलावतील व त्यामध्ये संबंधित आमदार, सभापती,
उपसभापती, प.स.सदस्य, सेवाभावी संस्था, कॉलेजचे प्राध्यापक इ. मान्यवरांना आमंत्रीत करुन सर्वांना
अभियानात सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन करतील.
३. दरवर्षी दिनांक ३० सप्टेंबर :- या दिवशी प्रत्येक ग्रामपंचायतीचे सरपंच मासिक सभेचे आयोजन करुन
त्यामध्ये ग्रामस्तरावरील कृती समितीचे गठण करतील.
४. दरवर्षी दिनांक १ आक्टोंबर :- या दिवशी महीला ग्रामसभा बोलविण्यात यावी व अभियानाच्या
तयारीची चर्चा करुन कृती कार्यक्रम तयार करतील
५. दरवर्षी दिनांक २ आक्टोंबर :- राज्यातील सर्व ग्रामपंचायतीतुन एकाच वेळी ग्रामसभा घेण्यात
येईल. या ग्रामसभेला जिल्हा व तालुकास्तरावरील विशेष अधिकारी उपस्थीत राहुन मार्गदर्शन
करतील. या दिवशी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची औपचारीक सुरुवात होईल
वातावरण निर्मीती करीता लाक्षणिक स्वरुपातील कृती कार्यक्रम
१. दरवर्षी दिनांक ३ व ४ आक्टोंबर :- स्वच्छता विषयक साहीत्याचे प्रदर्शन, प्रचार-प्रसिध्दी व प्रात्यक्षिके,
गवंडी मेळावा
२. दरवर्षी दिनांक ४ ते ७ आक्टोंबर :- ग्रामसफाई, घनकचरा व्यवस्थापन, कचरा मुक्ती जागृती मोहीम
३. दरवर्षी दिनांक ८ व ९ आक्टोंबर :- वैयक्तिक स्वच्छता जागृती (नखे काढणे, स्वच्छ आंघोळ, केस धुणे,
उवा निर्मुलन) मोहीम
४.दरवर्षी दिनांक १० ते १४ आक्टोंबर :- घर व परीसर स्वच्छता सजावट मोहीम
५.दरवर्षी दिनांक १५ आक्टोंबर :- हात धुवा मोहीम
६.दरवर्षी दिनांक १६ ते १८ आक्टोंबर :- शाळा व अंगणवाडी स्वच्छता जागृती मोहीम
७.दरवर्षी दिनांक १९ व २० आक्टोंबर :- सार्वजनिक इमारती स्वच्छता जागृती मोहीम.
८.दरवर्षी दिनांक २१ व२२ आक्टोंबर :- जनावरे स्वच्छता मोहीम,आदर्श गोठा व स्वच्छ जनावर स्पर्धा
९.दरवर्षी दिनांक २३ ते २८ आक्टोंबर :- रस्ते दुरुस्ती, सफाई व श्रमदान मोहीम
१०. दरवर्षी दिनांक २९ ते ३१ आक्टोंबर :- पाणी शुध्दता, प्रात्याक्षीक व प्रशिक्षण मोहीम
११. दरवर्षी दिनांक १ ते ५ नोव्हेंबर :- गटारे सांडपाणी व्यवस्थापन, सांडपाणी पुनर्वापर मोहीम
१२. दरवर्षी दिनांक ६ नोव्हेंबर :- गावात स्लोगन (घोषवाक्य) स्पर्धा, निबंध स्पर्धा इत्यादी
विवीध स्पर्धा , व्यसनमुक्ती मोहीम
१३. दरवर्षी दिनांक ७ व ८ नोव्हेंबर :- सुदृठ बालक स्पर्धा , माता बाल संगोपन, बचत गटाचा
सहभाग
१४. दरवर्षी दिनांक ९ नोव्हेंबर :- रोगनिदान व साथरोग प्रतिबंध मोहीम, पाणी गुणवत्ता
१५. दरवर्षी दिनांक १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर :- शौचालय बांधकाम, दुरुस्ती व शौचालय
वापराबाबत जनजागृती करणे, स्वच्छतेच्या
इतर सर्व घटकांवर भर देणे
१६.दरवर्षी दिनांक ३१ डिसेंबर :- संकल्प दिवस
ग्रामपंचायतींना वरीलप्रमाणे दिवस साजरा करणे अनिवार्य आहे. केलेल्या कामाचे रेकॉर्ड ठेवणेही आवश्यक आहे
ग्रामपंचायतींची तपासणीसाठीची तयारी व तपासणी कार्यक्रम
अ) दरवर्षी १ ते ५ जानेवारी :- जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व ग्रामपंचायतींनी ३० सप्टेंबर रोजीची गावातील स्वच्छतेची स्थीती ( ) व अभियान कालावधीत केलेल्या कामाची माहीती आपले पंचायत समितीच्या गट विकास अधिकार्यांकडे न चुकता सादर करावी
ब) दरवर्षी ६ ते २० जानेवारी :- जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व ग्रामपंचायतींची प्रत्यक्ष तपासणी करुन जिल्हा परिषद मतदर संघस्तरीय गुणांकन करणे, प्रतवारी ठरवुन व निकाल जाहीर करणे.
क) दरवर्षी २६ जानेवारी :- जिल्हा परिषद मतदारसंघ स्तरावरील बक्षीस वितरण समारंभ
ड) दरवर्षी २७ जानेवारी ते १० फेब्रुवारी :- पंचायत समिती स्तरावरील स्पर्धेसाठी ग्रामपंचायतींनी तयारी करणे.
इ) दरवर्षी ११ ते २८ फेब्रुवारी :- पंचायत समिती स्तरावरील स्पर्धेसाठी ग्रामपंचायतींची तपासणी व निकाल जाहीर करणे
फ)दरवर्षी दिनांक १ ते १० मार्च :- पंचायत समिती स्तरावरील बक्षीस वितरण समारंभ
ग) दरवर्षी दिनांक ११ मार्च ते १४ एप्रिल :- जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी ग्रामपंचायतींनी तयारी करणे
ह) दरवर्षी १५ ते ३० एप्रिल :- जिल्हा स्तरावरील स्पर्धेतील ग्रामपंचायतींची तपासणी व निकाल जाहीर करणे.
ज) दरवर्षी १ मे :- जिल्हा स्तरावरील बक्षीस वितरण समारंभ.
त) दरवर्षी दिनांक २ मे ते ३० जुन :- विभागस्तरावरील स्पर्धेसाठी ग्रामपंचायतींची तयारी करणे.
थ) दरवर्षी दिनांक १ ते १० ऑगस्ट :- विभागस्तरावरील स्पर्धेतील ग्रामपंचायतींची तपासणी व निकाल जाहीर करणे.
द) दरवर्षी १५ ऑगस्ट :- विभाग स्तरावरील बक्षीस वितरण कार्यक्रम
ध) दरवर्षी दिनांक १६ ते ३० सप्टेंबरः- राज्य स्तरावरील स्पर्धेतील ग्रामपंचायतींची तपासणी व निकाल जाहीर करणे.
य) दरवर्षी दिनांक २ आक्टोंबर :- राज्य स्तरावरील बक्षीस वितरण समारंभ.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धे अंतर्गत प्रत्येक स्तरावरील बक्षीसे
Ø अ) जिल्हा परिषद मतदारसंघ स्तर
Ø प्रथम क्रमांक :- रु. ५०००/-
Ø द्वितीय क्रमांक :- रु. ३०००/-
Ø तृतीय क्रमांक :- रु. २०००/-
सदर बक्षीसे जि.प.ने स्वनिधीतुन दयावयाची असुन त्यासाठी शासन स्तरावरुन निधी उपलब्ध होणार नाही.
Ø ब) पंचायत समिती स्तर
Ø प्रथम क्रमांक :- रु. २५०००/-
Ø द्वितीय क्रमांक :- रु. १५०००/-
Ø तृतीय क्रमांक :- रु. १००००/-
Ø प्रथम प्राथ. शाळा :- रु. १००००/-
प्रथम क्रमांक अंगणवाडी :- रु. ५०००/-
Ø क) जिल्हा स्तर
Ø प्रथम क्रमांक :- रु. ५.०० लाख
Ø द्वितीय क्रमांक :- रु. ३.०० लाख
Ø तृतीय क्रमांक :- रु. २.०० लाख
Ø प्रथम प्राथ. शाळा :- रु. ५०,०००/-
प्रथम क्रमांक अंगणवाडी :- रु. २५,०००/-
Ø ड) विभाग स्तर
Ø प्रथम क्रमांक :- रु. १०.०० लाख
Ø द्वितीय क्रमांक :- रु. ८.०० लाख
Ø तृतीय क्रमांक :- रु. ६.०० लाख
Ø प्रथम प्राथ. शाळा :- रु. १.०० लाख
प्रथम क्रमांक अंगणवाडी :- रु. ५०,०००/-
Ø इ) राज्य स्तर
Ø प्रथम क्रमांक :- रु. २५.०० लाख
Ø द्वितीय क्रमांक :- रु. २०.०० लाख
Ø तृतीय क्रमांक :- रु. १५.०० लाख
Ø प्रथम प्राथ. शाळा :- रु. ३.०० लाख
प्रथम क्रमांक अंगणवाडी :- रु. १.०० लाख
ग्राम अभियांतर्गत ग्रामपंचायतींना द्यावयाच्या बक्षीसाठी निवड समित्या.
o प्रथम फेरी - जिल्हा परिषद मतदार संघ समिती
o दुसर्या पंचायत समिती क्षेत्रातील जिल्हा परिषद कौसीलर :- अध्यक्ष
o दुसर्या पंचायत समितीमधील प्राथमिक आरोग्य केंद्गाचे डॉक्टर :- सदस्य
o दुसर्या पंचायत समितीतील एका जि.प. प्राथ. केंद्ग शाळा केंद्गाचा केंद्ग प्रमुख :- सदस्य
o दुसर्या पंचायत समितीतील कोणतीही एक मुख्य सेविका :- सदस्य
q ग्रामस्थांचे सनद अंतर्गत स्थापन केलेल्या प्रभाग समितीचे सचिव :- सदस्य सचिव
o द्वितीय फेरी - पंचायत समिती स्तर
o पंचायत समितीेचे सभापती :- अध्यक्ष
o बाल विकास प्रकल्प अधिकारी :- सदस्य
o गट शिक्षणाधिकारी :- सदस्य
o तालुका वैद्यकीय अधिकारी :- सदस्य
o गट विकास अधिकारी :- सदस्य सचिव
o तृतीय फेरी - जिल्हा स्तर
o अध्यक्ष जिल्हा परिषद :- अध्यक्ष
o मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. :- सदस्य
o गतवर्षीच्या अभियानात जिल्हा स्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतचे सरपंच/अभियान समितीचे अध्यक्ष व सदस्य यापेकी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निवडलेला प्रतिनिधी :- सदस्य
o जिल्हा पत्रकार संघाने नियुक्त केलेला प्रतिनिधी :- सदस्य
o उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) :- सदस्य सचिव
o चौथी फेरी - विभाग स्तर
o विभागीय आयुक्त :- अध्यक्ष
o उपायुक्त विकास :- सदस्य सचिव
o विभागीय उपसंचालक शिक्षण :- सदस्य
o विभागीय आयुक्तांनी निवडलेली सेवाभावी संस्था :- सदस्य
o एक जेष्ठ पत्रकार /संपादक :- सदस्य
o पाचवी फेरी - राज्य स्तर
o स्वच्छतेच्या क्षेत्रातील दोन वेगवेगळया स्वयंसेवी संस्थेचे दोन प्रतिनिधी- दोन सदस्य
o एक पत्रकार/ संपादक
राज्य स्तरावरील प्रथम बक्षीसपात्र ग्रामपंचायतीचे सरपंच अथवा अभियान समितीचे अध्यक्ष वा सदस्य
राज्य स्तरीय मुख्य समिती पुढीलप्रमाणे राहील
Ø प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय मुंबई :- अध्यक्ष
Ø प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय मुंबई :- सदस्य
Ø सेवाभावी संस्था म्हणुन युनिसेफ अथवा डब्ल्यु.एस.पी अथवा स्वच्छतेच्या कार्यक्षेत्राचा दिर्घानुभव असलेल्या संस्थेचा प्रतिनिधी :- सदस्य
उपसचिव/सहसचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय मुंबईः- सदस्य सचिव
जिल्हा स्तरावरील स्पर्धेमध्ये क्रमांक प्राप्त ग्रामपंचायती
|
वर्ष
|
प्रथम
|
द्वितीय
|
तृतीय
|
|
२०००-०१
|
आनंदवन प.स. वरोरा
|
तोरगाव प.स.ब्रम्हपुरी
|
बोडधा प.स. चिमुर
|
|
२०००-०२
|
राजगड प.स. मुल
|
कविठपेठ प.स. राजुरा
|
चिचगाव प.स. ब्रम्हपुरी
|
|
२०००-०३
|
राजगड प.स. मुल
|
बोरचांदली प.स. मुल
|
कन्हाळगाव प.स.नागभिड
|
|
२०००-०४
|
विरई प.स. मुल
|
बोरचांदली प.स. मुल
|
इसापुर प.स. राजुरा
|
|
२०००-०५
|
विरई प.स. मुल
|
बोरचांदली प.स. मुल
|
तळोधी प.स. ब्रम्हपुरी
|
|
२०००-०६
|
विरई प.स. मुल
|
मुई प.स. ब्रम्हपुरी
|
गोंडसावरी प.स. चंद्गपूर
|
|
२०००-०७
|
मुई प.स. ब्रम्हपुरी
|
कहाळगाव प.स.गोंडपिपरी
|
चेकआष्टा प.स. पोंभुर्णा
|
|
२०००-०८
|
लाडबोरी प.स.सिंदेवाही
|
शिवापुर बं. प.स. चिमुर
|
रानतळोधी प.स. भद्गावती
|
|
२०००-०९
|
नाचनभट्टी प.स.सिंदेवाही
|
नान्होरी प.स. ब्रम्हपुरी
|
धानापुर प.स.गोंडपिपरी
|
|
२०००-१०
|
भेंडाळा प.स. सिंदेवाही
|
जाम तुकुम प.स. पोंभुर्णा
|
सावरगाव प.स. चिमुर
|
Ø विभाग व राज्य स्तरावरील बक्षीसास पात्र ठरलेल्या ग्रामपंचायती
Ø सन २००२-२००३ या वर्षामध्ये ग्रामपंचायत राजगड पंचायत समिती मुल ला विभाग स्तरावरील प्रथम क्रमांकाचे बक्षीस तसेच राज्य स्तरावरील प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झालेले आहे
Ø सन २००६-२००७ या वर्षामध्ये ग्रामपंचायत मुई पंचायत समिती, ब्रम्हपुरी ला विभाग स्तरावरील द्वितीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झालेले आहे.
सन २००६-२००७ या वर्षामध्ये ग्रामपंचायत मुई अंतर्गत अंगणवाडी केंद्ग मुई ला विभाग स्तरावरील प्रथम पारीतोषीक तसेच राज्य स्तरावरील प्रथम पारीतोषीक प्राप्त झालेले आहे.
|